17 फेब्रुवारी

_*📚परीपाठ🌳*_
_
_*❂दिनांक:~ 17 फेब्रुवारी ❂*_

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*📖 सुविचार 📖*_
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*🌈म्हणी व अर्थ 🌈*_

*🏚️घर पहावे बांधून, लग्न पहावे करून*

*💫अर्थ:*
*घर बांधायला किंवा लग्न करायला आपल्या आंदाजा पेक्षा जास्त खरच येतो*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             _*📆 दिनविशेष 📆*_   

 *🌞या वर्षातील🌞 ४८ वा दिवस आहे.*

    _*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*_

*👉२००८ : कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.*
*👉१९६४ : अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.*
*👉१९२७ : ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.*

    _*🌹जन्मदिवस / जयंती🌹*_

*👉१८७४ : थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६)*
*👉१८५४ : फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती*

      _*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*_

*👉१९८६ : जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ*
*👉१८८३ : वासुदेव बळवंत फडके राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)*
*👉१६०० : सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्‍या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात आले.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          _*🥇सामान्य ज्ञान 🥇*_
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉महाराष्ट्र राज्याचे सद्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत?*
*🥇राजेश टोपे*

*👉साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?*
*🥇अहमदनगर*

*👉मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती?*
*🥇आठ*

*👉१९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो?*
*🥇शिव जयंती उत्सव*

*👉इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?*
*🥇कवितालेखन साहित्यलेखन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           _*🕸 बोधकथा 🕸*_

*🦊कोल्‍ह्याला शिक्षा* 

          *एक उंट जंगलात चरण्‍यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्‍ट कोल्‍हा त्‍याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्‍याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्‍हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्‍हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्‍हा कोल्‍हा म्‍हणाला,'' मी तर रोज जवळच्‍याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्‍या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्‍ह्याला त्‍याने तेथे नेण्‍यासाठी विनंती केली.* 

         *उंट कोल्‍ह्यासोबत शेतात गेला. कोल्‍ह्याने आधी जाऊन स्‍वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्‍ह्याने मग जोराने कोल्‍हेकुई सुरु केली. कोल्‍ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्‍याचे चार गडी शेतात घुसले. त्‍यांना पाहताच कोल्‍ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्‍यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.* 

          *त्‍याला मार खाताना पाहून कोल्‍ह्याला खूप आनंद झाला. या गोष्‍टीला काही दिवस गेले. कोल्‍ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्‍हा शेतात नेले व पुन्‍हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्‍यालाच मार पडतो ही गोष्‍ट आता उंटाच्‍या लक्षात आली व त्‍याने कोल्‍ह्याची खोड मोडण्‍याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्‍ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्‍यांना बाहेर काढण्‍याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्‍हा कोल्‍ह्याची वेळ आली तेव्‍हा उंटाने मुद्दामच जास्‍त खोल पाण्‍यात नेऊन डुबकी मारली. कोल्‍हा पाण्‍यात बुडून मरण  पावला.*

 *🧠तात्पर्य:- _सरळ स्वभावाचा  गैरफायदा घेऊ नये*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         _

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स