16 मार्च

*📚परीपाठ🌹*
*
*❂ दिनांक:~ 16 मार्च
        ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡कठीण काळात नियती जेव्हा आपल्याला नाचवत असते ना....*
*तेव्हा ढोल वाजवणारे काही जण आपल्यातलेच असतात....* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*💦पालथ्या घागरीवर पाणी.*

*💫अर्थ:-*
*केलेला उपदेश निष्फळ ठरने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 ७५ वा (लीप वर्षातील ७६ वा) दिवस आहे.*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉२००१ : नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते 'गांधी शांतता पुरस्कार' प्रदान*
*👉२००० : हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकदर यांना ’के. के. बिर्ला पुरस्कार’ जाहीर*
*👉१९६६ : अमल कुमार सरकार यांनी भारताचे ८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९३६ : भास्कर चंदावरकर – संगीतकार*
*👉१९०१ : प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश*
*👉१६९३ : मल्हारराव होळकर – इंदूरच्या राज्याचे संस्थापक, मराठेशाहीतील पराक्रमी सेनापती व मुत्सद्दी*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉१९९९ : कुमुदिनी रांगणेकर – इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करुन देणार्‍या लेखिका*
*👉१९४६ : ’गान सम्राट’ उस्ताद अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक*
*👉१९४५ : गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते?*
🥇ताजमहल (मुंबई)

*👉मुळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातुन वाहत जातात?*
🥇पुणे

*👉तांबे या खनिजासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?*
🥇चंद्रपुर

*👉भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?*
🥇पाच

*👉वीरधवल खाडे ही व्यक्ति कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
🥇जलतरन पट्टू ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *👍खरा मित्र*   
   
*आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी ! धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे - एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली.*

              *त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजालापण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. हि कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.*

*🧠तात्पर्य- माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनुष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणुसकीच्या दृष्टीने योग्य आहे*. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स