16 फेब्रुवारी

*📚परीपाठ🌳*
*
*❂ दिनांक:~ 16 फेब्रुवारी ❂*
        ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो, किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जातो* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*🥛दही खाऊ की मही खाऊ,*

*💫अर्थ:-*
*हे करू की ते करू असे होने.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌞या वर्षातील🌞 ४७ वा दिवस आहे.*

*लिथुएनियाचा स्वातंत्र्य दिन*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९१८ : लिथुएनियाने (रशिया व जर्मनीपासून) स्वातंत्र्य जाहीर केले.*
*👉१७०४ : औरंगजेबाने राजगड जिंकून त्याचे नाव नबीशाहगड असे ठेवले.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१८७६ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त (मृत्यू: ६ मे १९६६)*
*👉१७४५ : माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा, १६ व्या वर्षी पेशवेपदावर विराजमान झालेला अत्यंत कर्तबगार पेशवा. पानिपतच्या युध्दानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००१ : रंजन साळवी – 'पिंजरा', 'सवाल माझा ऐका',  आदी मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक*
*👉२००० : बेल्लारी शामण्णा केशवन – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, ’इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर’चे पहिले संचालक*
*👉१९४४ : धुंडिराज गोविंद ऊर्फ ’दादासाहेब’ फाळके* – *भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक, लेखक, छायाचित्रकार, दिग्दर्शक, संकलक,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे?*
🥇अमेरिका

*👉दूध नासने किंवा दही बनने ही कोनती प्रक्रिया आहे?*
🥇जीव - रासायनिक

*👉सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते?*
🥇फेदम या एककाने

*👉सूर्यकुलाचा शोध कोणी लावला?*
🥇कोपर्निकस

*👉रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?*
🥇टेंपिंग ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *👍खरी नक्कल*        

*भोजराकडे एक बहुरुपी गेला. राजाने त्याला आपले सोंग घ्यायला सांगितले. थोड्याच वेळात हुबेहुब त्या राजाप्रमाणे बनून, तो बहुरुपी राजसभेत शिरला. त्याचे त्याच्या कलेतील असामान्य कौशल्य पाहून खुष झालेल्या भोजराजाने त्याला एक मौल्यवान रत्नहार देऊ केला.*

             *भोजराजाचे सोंग घेतलेल्या त्या बहुरुप्याने तो रत्नहार तर स्विकारला नाहीच, पण राजाला साधा मुजरा करण्याचा शिष्टाचारही पाळला नाही. एवढंच नव्हे तर तो राजसभेत ज्या राजेशाही दिमाखाने आला, तशाच तर्हेने निघून जाऊ लागला. दरबारी मंडळींना त्या बहुरुप्याचा हा उध्दटपणा आवडला नाही.*
*त्यांच्यापैकी काहीजण राजाच्या कानात काहीतरी कुजबुजले. त्याबरोबर राजाने आपल्या सेवकांना त्या बहुरुप्याला पकडून आपल्यापुढं हजर करण्याचा हुकुम सोडला. त्या बहुरुप्याला पकडून समोर आणताच राजा त्याला म्हणाला, 'अरे उध्दटा ! तुला मी एवढा रत्नहार देऊ केला, पण तो तर तू स्वीकारला नाहीसच; पण मला मुजरा करण्याचं साधे सौजन्यही न दाखवता, तू मला सरळ पाठ दाखवून निघून की रे गेलास ? तुझ्या या अपराधाबद्दल मी तुला आता कारावासाची शिक्षा ठोठावणार आहे.'*

             *बहुरुपी म्हणाला, 'महाराज ! सोंग घेतलं असलं, तरी ते राजाधिराज भोजमहाराजांच घेतलेलं आहे. तेव्हा इनाम म्हणून रत्नहार स्विकारणं, आपल्यापुढे वाकून मुजरा करणं किंवा आपल्याला पाठ न दाखविता उलटं चालत जाणं, या गोष्टी मी केल्या असत्या, तर आपला अपमान झाला असता, म्हणून मी हुबेहुब आपल्याप्रमाणे वागलो.' बहुरुप्यानं केलेल्या या खुलाशानं भोजराजा प्रसन्न झाला. त्याने त्याला दोन-तीन दिवस शाही पाहूणा म्हणून ठेवून घेतली आणि त्याला तो रत्नहार व एक हजार सुवर्ण मोहोरा इनाम म्हणून दिल्या*. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स