16 जानेवारी

*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 16 जानेवारी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

_*💡प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*🦊ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ*

*💫अर्थ:-*
*कष्ट केल्याविना खान्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆* 
  
 *मार्टिन लूथर किंग दिन:अमेरिका.*

*👨‍🏫शिक्षक दिन : थाइलैंड*

*🌞या वर्षातिल🌞 १६ दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉१६८१ : संभाजी राजेंचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक झाला.*
*👉१९५५ : नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.*
*👉२००८ : टाटा मोटर्सच्या, ‘नॅनो’ या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉सैय्यद अब्दुल मलिक,असमिया साहित्यिक*
*👉१९२६ : ओ.पी.नय्यर, भारतीय संगीतकार.*
*👉१९४६ : कबीर बेदी, भारतीय अभिनेता.*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉२००५ : श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, संगीतकार, पेटीवाले मेहेंदळे*
*👉२००१ : पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीड़ा संघटक.*
*👉१९६६ : साधु वासवानी, आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉भारत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ति कोण आहेत?*
*🥇मुकेश अंबानी*

*👉भारताचे पंतप्रधान होणारे पहिले अर्थतज्ञ व्यक्ती कोण होते?*
*🥇डॉ.मनमोहन सिंग*

*👉महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीतही टिकुन राहनारा वृक्ष कोणता?*
*🥇बाभुळ*

*👉पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी  कोणी उपोषण केले?*
*🥇साने गुरुजी*

*👉रेशिम उत्पादनात कोणत्या देशाचा प्रथम क्रमांक लागतो?*
*🥇चीन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

     *🙏स्वामी विवेकानंद*

   *एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतानाची गोष्ट आहे.स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्रची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात. तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.*

    *"अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे. आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील."*

   *तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे. मी आज काय करतो याची नाही.*

*🧠तात्पर्य:-* 
   *"कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.*
 *एका दिवसात यश प्राप्त होत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स