15 मार्च
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 15 मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*👨👦बापसे बेटा सवाई.*
*💫अर्थ:-*
*वडीलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌎जागतिक ग्राहक दिन*
*🌞या वर्षातील🌞 ७४ वा (लीप वर्षातील ७५ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१८७७ : इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.*
*👉१८३१ : मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले*
*👉१६८० : शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९०१ : विजयपाल लालाराम तथा ’गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक*
*👉१८६० : डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ*
*👉१७६७ : अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००० : लेडी राणू मुखर्जी – विचारवंत आणि कलासमीक्षक, रविंद्रनाथ टागोर यांच्या जवळच्या सहकारी*
*👉१९९२ : डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी, गीतकार व शायर*
*👉१९३७ : व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉वाल्मिकी यांनी लिहलेल्या पुस्तकाचे नाव काय?*
🥇रामायण
*👉ग्रामोफोनचा संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते?*
🥇थॉमस एडिसन
*👉भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते?*
🥇लता दीदी मंगेशकर
*👉WTO चे संक्षिप्त रूप काय?*
🥇वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन
*👉'कोलार' सोन्याची खाण असणारे राज्य कोणते?*
🥇कर्नाटक ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*👊'मी' पणा*
*एका साधूकडे काही उद्देशाने एक गृहस्थ गेला. झोंपडी बाहेरुनच त्यांनी 'महाराज' म्हणून हाक मारली.*
*महाराजांनी विचारल, "कोण आहे?" गृहस्थ म्हणाले, "मी". साधू "कोण"?*
*पुन्हा उत्तर आल 'मी'*
*साधू म्हणाले, 'तू कोण तुला तरी माहित आहे का? तू कोण आहेस ते शोध आणि ये.*
*त्यावर गृहस्थानी आपले नाव सांगितले' 'विजयराव.'*
*साधूंनी त्यांना आत बोलवले आणि म्हणाले 'मी' पणा सोडावा. तो फार घात करतो. खरं म्हणजे तुम्ही विजयराव ही नव्हे.स्वतः ला विसरा आणि इतरांशी एकुरूप व्हा तरच तुमची खरी ओळख सर्वांना पटेल.*
*🧠तात्पर्य :-*
*माणसाच्या अंगी 'मी' नसावा.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment