15 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
15 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🥕गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.*
*💫अर्थ:-*
*एखादे काम सिद्धिस गेले तर ठीक, नाही तरी नुकसान नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌐जागतिक बालकर्करोग दिन*
*🌞या वर्षातील🌞 ४६ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९४२ : दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.*
*👉१९३९ : काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९४९ : नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक*
*👉१७३९ : संत सेवालाल महाराज* – *बंजारा समाजाचे अराध्य दैवत,*
*मानवतावादी कल्याणाची गुढी उंच नेणारे महान संत*
*👉१५६४ : गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९८० : मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय*
*👉१९८० : कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष*
*👉१८६९ : मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉ग्रामगीता या साहित्यकृतिचे रचयिते कोण आहे?*
🥇तुकडोजी महाराज
*👉भारतातील सर्वात प्रथम I. C. S. अधिकारी व्यक्ती कोण होते?*
🥇सत्येन्द्रनाथ टागोर
*👉भारत देशातील सर्वोच्य शौर्य पुरस्कार कोणता?*
🥇परमवीर चक्र
*👉जगातील सर्वात लांबच लांब कविता कोणती?*
🥇महाभारत काव्य
*👉स्वच्छ पाण्यात सूर्यकिरण किती खोल जातात?*
🥇1500 फुट खोल ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🦚यात श्रीकृष्ण आहे?*
*एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की* *यात काय आहे?*
*दुकानदार म्हणाला* *त्यात मीठ आहे.* *संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले* *यात काय आहे?* *दुकानदार म्हणाला* *यात साखर आहे.*
*असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले* *आणि यात काय आहे?*
*दुकानदार म्हणाला यात श्रीकृष्णआहे.*
*सन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्यासी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला* *"महाराज तो रिकामा डबा आहे पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो."*
*बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते ईश्वराला म्हणाले*
*"अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्यागोष्टी साठी मी एवढा भटकलो घरदार सोडून सन्यासी झालो ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस. परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे"*.
*असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.*
*जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख* *अशा लौकिक गोष्टीने भरले आहे तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. लोकाना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment