13 मार्च
*📚परीपाठ🌹*
*❂ दिनांक:~ 13 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡सुख आणि दुःख*
*हे माणसाच्या परिस्थिती पेक्षा,*
*माणसाच्या मनस्थितीवर,*
*जास्त अवलंबून असते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🍪ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी*
*💫अर्थ:-*
*जो आपल्यावर उपकार करतो, त्या उपकार कर्त्याचे उपकार स्मरुन त्याचे गुणगान गावे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ७२ वा (लीप वर्षातील ७३ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९४० : अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळया घालून हत्या केली.*
*👉१९१० : पॅरिसहुन लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली.*
*👉१७८१ : विल्यम हर्षेल याने युरेनसचा शोध लावला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९२६ : रविन्द्र पिंगे – ललित लेखक*
*👉१८९३ : डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक*
*👉१७३३ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००४ : उस्ताद विलायत खाँ – सतारवादक*
*👉१९९४ : श्रीपाद यशवंत कोल्हटकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व 'सिटू' या कामगार संघटनेचे लढवय्ये नेते*
*👉१८०० :* *बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस'* – *पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ कोणते आहे?*
🥇राहुरी (अहमदनगर)
*👉चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे?*
🥇कोल्हापुर
*👉दुष्काळ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?*
🥇सुकाळ
*👉भारतरत्न मिळवनारी पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे?*
🥇डॉ.धोंडो केशव कर्वे
*👉ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे?*
🥇बीड ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*▪️मूल्यांकन▪️*
*एका महात्म्याच्या शिष्यांमध्ये एक राजकुमार आणि एक शेतकऱ्याचा मुलगा होता. राजकुमाराला राजपुत्र असण्याचा अहंकार होता.मात्र शेतकऱ्याचा मुलगा विनम्र आणि कर्मठ होता.राजकुमाराचे वडील अर्थात तेथील राजा दरवर्षी एका स्पर्धेचे आयोजन करीत असत. त्यात बुद्धिमत्ता आणि दृष्टीची पारख केली जात असे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दूरदूरचे राजकुमार येत असत. अध्ययन पूर्ण झाल्यावर राजकुमाराने शेतकऱ्याच्या मुलालाही या स्पर्धेत सामील होण्याचे आमंत्रण दिले. कारण त्याला तेथे बोलावून त्याचा अपमान करण्याचे त्याच्या मनात होते. जेंव्हा शेतकऱ्याचा मुलगा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा त्याला राजकुमार आणि राजपुत्रांमध्ये बसण्यास मनाई केली.*
*शेवटी शेतकऱ्याचा मुलगा वेगळा बसला. राजाने प्रश्न विचारला,"तुमच्यासमोर जर जखमी वाघ आला तर तुम्ही त्याच्यावर उपचार कराल का त्याला तसेच सोडून निघून जाल ?" सर्व राजपुत्रांचे उत्तर हे एकच होते. "आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वाघावर उपचार करणार नाही." मात्र शेतकऱ्याचा मुलगा म्हणाला," मी जखमी वाघावर उपचार करेन कारण जखमीचा जीव वाचविणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. माणूस होण्याच्या नात्याने माझे हे कर्म आहे. मांस खाणे हे जर वाघाचे कर्म असेल तर तो बरा झाल्यावर माझा जीव का घेईना ? त्यात त्याचा दोष नाही. माणूस म्हणून मी त्याच्यावर उपचार करणे हे माझे आद्यकर्तव्य आहे." हे उत्तर ऐकताच राजाने त्या मुलाला विजयी घोषित करून राज्याचे मंत्रिपद दिले.*
*🧠तात्पर्य-*
*व्यक्तीचे मुल्यांकन हे त्याच्या विचारातून होत असते. त्याच्या राहणीमानावरून कि त्याच्या दिसण्यावरून होत नसते. कधी कधी साधारण दिसणारी माणसे असाधारण कार्य करतात.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment