13 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 13 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡चांगली माणसं सोबत असली की,*
*वाईट दिवस पण छान जातात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*💧तहान लागल्यावर विहिर खणने*
*💫अर्थ:-*
*पुढे येणाऱ्या अडचणीची आगाऊ तरतूद न करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌎जागतिक रेडिओ दिन*
*🌞या वर्षातील🌞 ४४ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉२००३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान*
*👉१७३९ : कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९१० : दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित*
*👉१८७९ : सरोजिनी नायडू – भारतीय कोकिळा, प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता.*
*👉१८३५ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉२०१२ : अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी*
*👉१९७४ : ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक*
*👉१९०१ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर –गायक नट*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकानाला काय म्हणतात?*
*🥇क्षितिज*
*👉प्लासीची लढाई ही कोनामध्ये झाली?*
*🥇इंग्रज विरुद्ध नवाब सिराज उद्दोला*
*👉मराठी व्याकरनातील काळाचे तीन प्रकार कोणते?*
*🥇1) भूतकाळ 2) वर्तमान काळ 3) भविष्य काळ.*
*👉दांडी यात्रेची सुरवात कोणत्या ठिकानापासून झाली?*
*🥇साबरमती आश्रम*
*👉वनस्पतीच्या जमिनीच्या खालच्या अक्षभागास काय म्हणतात?*
*🥇मूळ*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*▪शब्दांच्या पुढे▪*
*एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.*
*तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी स्किन चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.*
*त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.*
*असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.*
*त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.*
*आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य आंधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,*
*🧠तात्पर्य:-*
*काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.*
*हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment