13 जानेवारी

*📚परीपाठ🌳*
*
*❂दिनांक:~ 13 जानेवारी 
       
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡सुख म्हणजे,*
*कालच्या दिवसाची खंत नसणे*,
*आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे, आणि उद्याच्या दिवसाची चिंता नसणे*....
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*👨‍🦳आजा मेला,नातु झाला👶*

*🔱अर्थ:-*
*एखादे नुकसान व्हावे आणि त्याचवेळी दूसरी फायद्याची गोष्ट होणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌞या वर्षातील🌞 १३ वा दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉१९९६ : पुणे - मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.*
*👉१९६४ : कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार*
*👉१९५७ : हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९८३ : इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार*
*👉१९४९ : राकेश शर्मा, पहिला भारतीय अंतराळवीर*
*👉१९१९ : एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री,*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉२०११ : प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते*
*👉१९९७ : मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक*
*👉१९८५ : मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र  अभिनेता*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉सुखकर्ता दुखहर्ता हे पद्य कोणी लिहले?*
🥇श्रीरामदास स्वामी

*👉जगातील सर्वात मोठा धर्म कोनता?*
🥇ख्रिश्चन

*👉कागदाऐवजी प्लेस्टिकच्या नोटा सर्वात प्रथम कोणत्या देशाने वापरल्या?*
🥇ऑस्ट्रेलिया

*👉कपिल देव हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
🥇क्रिकेट

*👉देशातील सुवर्ण मंदिराचे शहर कोनते?*
🥇अमृतसर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

*📚शब्दांच्या पुढे*
     
      *एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं. ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती.*

  *तो तिच्यावर खूप प्रेम करायचा काही काळाने त्या मुलीला कोणता तरी स्किन चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.*

    *त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली, इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधळे पणा आला.*

    *असेच दिवस चालले. काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते व तो तिच्यावर तसाच प्रेम करायचा जसा पहीले करत होता.*

     *त्या मुलीचा आजार वाढला व कालांतराने तिचा मृत्यू झाला. त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीचा अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडला.*

     *आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता, तेवढ्ययात त्याला एका शेजारीने विचारले तू तरआंधळा एकटा कसा राहशील. त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्धे आयुष्य आंधळे पणाचं नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल व माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हेच जास्त दुःख झालं असत, ती खूप प्रेमळ होती व एक चांगली बायको होती. मला तिला आनंदी ठेवायचं होत,*

*🧠तात्पर्य:-* 
    *काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक  गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल.*
   *हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे. आपण एकमेकां शिवाय काहीच नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स