12 मार्च.

*📚परीपाठ🌹*

*❂ दिनांक:~ 12 मार्च ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🖋 सुविचार 🖋*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

    *💡कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा त्याचा शेवट करतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *⚜म्हणी व अर्थ ⚜*

*👤अढ़ीच्या दिढ़ी सावकाराची गढ़ी*

*💫अर्थ:-*
*अडकलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो*     ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*    

*🌞या वर्षातील🌞 ७१ वा (लीप वर्षातील ७२ वा) दिवस आहे.*

*☸️यशवंतराव चव्हाण जयंती*

    *🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*

*👉१९९९ : सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला.*
*👉१९९२ : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २४ वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारुन देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले.*
*👉१९३० : ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे महात्मा गांधी यांनी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात केली.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९१३ : यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री*
*👉१९११ : दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर – गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर*
*👉१८९१ : ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते*

      *🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*

*👉२००१ : रॉबर्ट लुडलुम – अमेरिकन लेखक*
*👉१९९९ : यहुदी मेनुहिन – प्रसिद्ध व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक*
*👉१९४२ : रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?*
🥇ओरिसा

*👉कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे?*
🥇पर्वत शिखर

*👉ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?*
🥇प्रथम

*👉चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?*
🥇कर्नाटक

*👉सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?*
🥇नर्मदा  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*
     
    *🤝"आपलेपण"*
                
       *एक गरुड़ पक्षी एका उंच कड्यावर बसून ससा टेहळित असता एका तिरंदाज पारध्याने त्यास पाहिले. आणि अचूक नेम धरून तीर सोडला.*
                   
    *तो तीर त्या गरुडाच्या मर्मस्थानी लागून तो अगदी मरनोन्मुख झाला. मरता मरता उरात शिरलेल्या तिराकडे त्याची नजर गेली आणि तो पाहतो तर त्या तिराच्या पिसा-यास त्याचीच पिसे लावलेली त्याच्या दृष्टिस पडली.*
        *तेव्हा  तो म्हणाला...*

    *"माझ्या पंखातील पिसांनी त्याचा पिसारा सज्ज केला आहे."*
    *अशा तिराने मी मरावे याबद्दल मला वाईट वाटले.*

*🧠तात्पर्य :-* 
    *आपल्यावर आलेले संकट आपल्याच लोकांच्या मदतीने उत्पन झालेले पाहून त्याबद्दलचे दुःख दुणावते.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         *🌐 आजच्या बातम्या 🌐*

*➡️ राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पुण्यात पडसाद, विद्यार्थ्याचं उत्स्फूर्त ठिय्या आंदोलन.. नवी पेठेत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा रास्ता रोको* 
*➡️ राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोरोनाची लस!* 
*➡️ मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला निगेटिव्ह असल्याचा अहवाल देणाऱ्या लॅब टेक्निशियनला बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कारवाई* *➡️ सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना जातीचा दाखला देणाऱ्या शिवसिद्ध बुळ्ळा याच्याकडून मोठं घबाड ताब्यात, बनावट सही शिक्क्याचा वापर करुन बनवले हजारो बनावट दाखले* 
*➡️ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांकडून 26 मार्चला भारत बंदची घोषणा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏*
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English