12 फेब्रुवारी
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 12 फेब्रुवारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡तुमच्यावर* *जळणारे नेहमी*
*सोबत असावेत तुम्ही नेहमी* *प्रकाशात* *राहता....!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*🗣️बोलेल तो करेल काय?*
*💫अर्थ:-*
*केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ४३ वा दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉१९९३ : एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.*
*👉१५०२ : लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्या सफरीवर निघाला.*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९२० : प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता*
*👉१८७१ : चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू एन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते*
*👉१८०९ : चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉२००१ : भक्ती बर्वे – अभिनेत्री*
*👉२००० : विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते*
*👉१७९४ : पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीचे नाव काय?*
*🥇मिशेल ओबामा*
*👉मराठी वर्णमालेत आलेले नवीन स्वरादी कोणते आहे?*
*🥇ऍ आणि ऑ*
*👉गीतांजली या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे?*
*🥇रवींद्रनाथ टागोर*
*👉भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?*
*🥇शिक्षक दिन (५ सप्टेंबर)*
*👉उत्क्रांती वादाचा सिद्धांत कोणी मांडला?*
*🥇चार्ल्स डार्विन (इंग्लैड)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*▪गाढव व लांडगा▪*
*एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’ लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले.*
*🧠तात्पर्य :-*
*काही माणसे इतकी कृतघ्न असतात, की ज्याने आपल्याला संकटातून वाचवले त्याच्याशीसुध्दा ते शिष्टपणे वागतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment