12 जानेवारी
*📚परीपाठ🌳*
*❂ दिनांक:~ 12 जानेवारी
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡पराभव हा आयुष्याचा भाग आहे पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जीवंतपणाची निशाणी आहे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🏚️घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.*
*🔱अर्थ:-*
*स्वता खर्च करुण ईतरांची कामे करणे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🇮🇳राष्ट्रीय युवक दिन*
*🌞या वर्षातील🌞 १२ वा दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉२००६ : हज यात्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू*
*👉१९९७ : सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला ’बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान*
*👉१९३१ : सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९६३ : स्वामी विवेकानंद.*
*👉१९०२ : महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत,स्वातंत्र्य सैनिक, लेखक*
*👉१८५४ : व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद*
*👉१५९८ : राजमाता जिजाबाई*
*(मृत्यू: १७ जून १६७४)*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉२००५ : अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार*
*👉१९४४ : वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी,*
*👉१८९७ : सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉संताची भूमी असे कोनत्या नदीच्या खोऱ्यास म्हणतात?*
🥇गोदावरी नदी
*👉शेवालामध्ये कोनते द्रव्य असते?*
🥇हरीतद्रव्य
*👉आसामचे अश्रु कोणत्या नदीला म्हणतात?*
🥇ब्रम्हपुत्रा नदी
*👉संगणकीय भाषेत MB म्हणजे काय?*
🥇मेगा बाइट्स
*👉हवेतिल ध्वनीचा वेग प्रति सेकंद किती असतो?*
🥇३३ मीटर प्रति सेकंद ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*⚙️दळणाचे जाते आणि खजिना*
*राजा भीमसेन याला आपल्या दौलतीबद्दल प्रचंड घमेंड होती. एके दिवशी त्याला त्याचा मित्र समशेर भेटण्यासाठी म्हणून आला. मित्राचे राजाने मनापासून स्वागत केले. त्याचा यथायोग्य पाहुणचार केला. विश्रांतीनंतर राजाने त्याला आपला महाल पाहण्यासाठी आमंत्रण दिले. दोघेहीजण महालातून फिरत असताना राजाने आपल्या श्रीमंतीचा थाट मित्राला दाखविण्यास सुरुवात केली. सर्वत्र त्याच्या श्रीमंतीचे कोंदण कसे आहे याबद्दल राजा मोठ्या गर्वाने सर्व माहिती देत होता. सर्व ठिकाणी फिरून झाल्यावर राजाने शेवट त्याला आपल्या खजिन्याच्या खोलीकडे नेले. राजाचा प्रचंड मोठा खजिना पाहून समशेरचे डोळे दिपून गेले. तो अचंबित होऊन खजिना पाहतच बसला. राजा खजिन्याबद्दल माहिती सांगतच होता की हा खजिना किती किंमती आहे. अनेक दुर्मिळ रत्ने, अलंकार, जडजवाहिर, मोती, सोने, चांदी, अनमोल अशा वस्तू कशा मी जमा केल्या आहेत. या खजिन्याच्या सुरक्षेसाठी काहीशे सैनिक चोवीस तास पहारा देत असतात. अशी सर्व माहिती राजा देत असतानाच समशेर ऐकत होता पण त्याचे राजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होत होते. काही वेळाने समशेर शेवटी राजाला म्हणाला,’’मित्रा हे इतके धन तू जमा केलेले आहेस पण याचा दुस-यांनाही काही फायदा होतो की नाही’’ राजा म्हणाला,’’ अरे मित्रा, इतक्या बहुमूल्य अशा खजिन्याचा माझ्याशिवाय दुस-या कोणाला फायदा होणार आहे.’’ यानंतर समशेर राजाला बरोबर घेऊन एका झोपडीकडे गेला. तिथे एक वृद्ध महिला जात्यावर धान्य दळत बसली होती. समशेरने राजाला ते दळणाचे जाते दाखवून म्हणाला,’’ राजा हे जातेही दगडाचे आहे आणि तुझ्या खजिन्यात तू जी रत्ने ठेवली आहेत ती पण दगडाचीच आहेत. फरक इतकाच आहे की त्या रत्नांचा तुझ्याशिवाय कुणालाच फायदा नाही आणि या दगडाच्या जात्याचा मात्र सगळ्या गावाला फायदा होतो. गावकरी मंडळी येथे येतात व धान्य दळून घेऊन जातात. तू ज्यांना रत्नांच्या पहा-याला सैनिक उभे केले आहेत त्यांच्या अंगी शक्ती येते ती सुद्धा या जात्यातून निघणा-या पीठामधून. म्हणून राजन मला तुझ्या सर्व खजिन्यापेक्षा, राज्यातील सर्व श्रीमंतीपेक्षा ही दगडाची जाती मला सर्वश्रेष्ठ वाटली.’’ राजाला आपली चूक कळाली व त्याची घमेंड पूर्ण उतरून गेली.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment