11 फेब्रुवारी

*📚परीपाठ🌳*

*❂दिनांक:~ 11 फेब्रुवारी 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *📖 सुविचार 📖*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*💡जर मनात द्रुढ संकल्प आणि अतुट विश्वास असेल तर ध्येय गाठणे कठीन नाहीं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🌈म्हणी व अर्थ 🌈*

*▪️उधार तेल खवट.*

*💫अर्थ:-*
*उधारीच्या वस्तुत काही ना काही खराबी किंवा उणीव असतेच.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
             *📆 दिनविशेष 📆*   

 *🌞या वर्षातील🌞 ४२ वा दिवस आहे.*

    *🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*

*👉१९९० : २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका*
*👉१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.*
*👉१८१८ : इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.*

    *🌹जन्मदिवस / जयंती🌹*

*👉१९४२ : गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री*
*👉१९३७ : बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर*
*👉१८४७ : थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक*

      *💐मृत्यू / पुण्यतिथी💐*

*👉१९९३ : सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी*
*👉१९४२ : जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते*
*👉१६५० : रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
          *🥇सामान्य ज्ञान 🥇*
     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

*👉M.C.S चे संक्षिप्त रूप काय आहे?*
*🥇मास्टर ऑफ कॉम्प्यूटर सायन्स*

*👉आधुनिक संगनकाचे जनक कोनाला म्हणत?*
*🥇डॉ.एलन सम तुरिग*

*👉PSLV-C6 हे कशाशी संबधित आहे?*
*🥇प्रक्षेपण यान*

*👉शेतीला पूरक ठरणारा महत्वाचा व्यवसाय कोणता?*
*🥇दुग्ध व्यवसाय*

*👉गंगा ही नदी बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखली जाते?*
*🥇पद्मा*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
           *🕸 बोधकथा 🕸*

     *▪भिकारी आणि तरूण मुलगा▪*

*एक भिकारी होता. तो आंधळा व पांगळा होता. सतत एका जागी बसून असायचा. कधी त्‍याला खायला मिळे तर कधी उपाशीपोटी झोपून जाई. त्‍यामुळे त्‍याची अवस्‍था हाडाच्‍या सापळ्यासारखी झाली होती. जन्‍माने तो अंध नव्‍हता तर वृद्धत्‍वामुळे त्‍याला अंधपणा आला होता. त्‍यातच त्‍याला कुष्‍ठरोगही झाला होता. त्‍यामुळे लोक जरासे त्‍याच्‍यापासून लांबच राहत. बिचारा भिकारी रस्‍त्‍यावर बसून लोकांकडे कळवळून भीक मागत असे. पण त्‍याच्‍या त्‍या कुरुप रुपामुळे तो कुणालाही आवडत नसे.  त्‍याच रस्‍त्‍यावरून एक कॉलेजवयीन तरूण जात असे. त्‍याचा जाण्‍यायेण्‍याचा रस्‍ताच तो होता त्‍यामुळे त्‍या तरूणाला हा भिकारी रोजच दिसत असे. भिका-याची अशी अवस्‍था पाहून तरूणाला खूप वाईट वाटे. कधीकधी तो दोनपाच रूपये त्‍या भिका-याला देतही असे पण मनातून मात्र तो खूप दु:खी होत असे. तरूणाला वाटे की आंधळा, पांगळा, कुष्‍ठरोग झालेला देह घेऊन जगताना या जीवाला किती यातना होत असतील. देवसुद्धा अशा जीवांना पटकन का बरे उचलत नाही. एकेदिवशी तो भिका-याजवळ थांबला व म्‍हणाला,''बाबा, देवाने अशी अवस्‍था केली असतानासुद्धा तुम्‍ही देवाचेच नाव घेऊन का जगत आहात. तुम्‍ही भीक मागून पोट भरता, पण देवाला मरण मागण्‍याची तुम्‍ही का प्रार्थना करत नाही.'' तरूणाच्‍या या बोलण्‍यावर भिकारी हसला व म्‍हणाला,'' मुला, मरण मागून या यातनांपासून दूर जावे ही गोष्‍ट मला किंवा परमेश्‍वराला दोघांनाही कळते पण कितीही जरी मी प्रार्थना केली तरी या जन्‍माचे भोग भोगल्‍याशिवाय माझी सुटका नाही हे त्‍या परमेश्‍वराला जास्‍त कळते आणि मी रोजच झोपण्‍यापूर्वी प्रार्थना करतो की देवा यातून सुटका कर पण देवाला वाटते की, मला जास्‍तीत जास्‍त लोकांनी बघावे आणि विचार करावा की पूर्वी मी ही तुमच्‍यासारखाच हातीपायी धड होतो, सुंदर दिसत होतो पण अपघातात पाय गेले, म्‍हातारपणाने डोळे गेले आणि अचानक कुष्‍ठ उदभवले. यातून परमेश्‍वर सुचवू पाहतो आहे की सगळे दिवस सारखे नसतात त्‍यामुळे कोणत्‍याही गोष्‍टीचा अहंकार बाळगू नये.'' भिका-याचे हे बोल ऐकताच तरूण मुलगा अचंबित झाला, त्‍याच्‍या सहज बोलण्‍यात त्‍याने फार मोठे तत्‍वज्ञान शिकविले होते.*

*🧠तात्‍पर्य :-*
*सर्व दिवस सारखे नसतात, त्‍यामुळे प्राप्त परिस्थितीमध्‍ये अहंकार न बाळगणे हेच बरे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
         

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

जालना नवोदय कट ऑफ लिस्ट 2025

इतिहासात पहिल्यांदाच नवोदय परीक्षामधील मुलांचे मार्क कळत आहेत. बघा यावर्षी चे मार्क्स