10 मार्च
*📚परीपाठ🌳*
*❂दिनांक:~ 10 मार्च
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📖 सुविचार 📖*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*💡आपल्या मनातील ओझं कमी करण्याचे ठिकाण म्हणजे "मैत्री*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🌈म्हणी व अर्थ 🌈*
*‼️शेंडी तुटो की पारंबी तुटो.*
*💫अर्थ:-*
*पक्का निश्चय करणे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌞या वर्षातील🌞 ६९ वा (लीप वर्षातील ७० वा) दिवस आहे.*
*🗞 महत्त्वाच्या घटना 🗞*
*👉1862 : अमेरिकेत कागदी चलन नोटांची सूरवात झाली.*
*👉1876 : अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी त्यांचा सहकारी थॉमस वेट्सन याच्याशी दूरध्वनी वरून पहिल्यांदा संवाद साधला*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉1918 : गायक आणि अभिनेता सौदागर नागनाथ गोरे यांचा जन्म*
*👉1929: कवी मंगेश पाडगांवकर यांचा जन्म*
*💐मृत्यू / पुण्यतिथी💐*
*👉1897 : पहिल्या महिला शिक्षक आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन*
*👉1878: इटालियन स्वातंत्रवीर जोसेफ मैझिनी यांचे निधन*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉मुस्लिम लीगची स्थापना केंव्हा झाली?*
🥇1906
*👉जिथे आकाश जमिनीला टेकल्या सारखे दिसते असे ठिकाण कोणते?*
🥇क्षितिज
*👉तीक्ष्ण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?*
🥇बोथट
*👉स्वातंत्र्य आंदोलनाचे पवित्र गीत कोणते?*
🥇वंदे मातरम्
*👉भारतीय संस्कृतीतील चार वर्ण कोणते?*
🥇ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*👤एकाग्रता*
*एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. *ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्यांना ती मुले आवडली होती. ते म्हणाले,’’ जे काही तुम्ही करत होता त्यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्य होतात.’’ मुले स्वामींजींपुढे नतमस्तक झाली.*
*🧠तात्पर्य :-*
*ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment