1 मार्च
*📚परीपाठ🌹*
*
*❂ दिनांक:~ 1 मार्च ❂* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🖋 सुविचार 🖋*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
" *💡नाव* *आणि* *ओळख* *छोटी* *असली तरी चालेल पण* *स्वत:ची* *असली पाहीजे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*⚜म्हणी व अर्थ ⚜*
*🕵️♂️चोराची पावले चोरालाच ठाऊक*
*💫अर्थ:-*
*वाईट मानसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*📆 दिनविशेष 📆*
*🌎जागतिक नागरी संरक्षण दिन*
*🌞या वर्षातील🌞 ६० वा (लीप वर्षातील ६१ वा) दिवस आहे.*
*🌹 महत्त्वाच्या घटना 🌹*
*👉१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.*
*👉१९२७ : रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.*
*👉१९०७ : ’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना*
*🌹जन्मदिवस / जयंती🌹*
*👉१९६८ : सलील अंकोला – क्रिकेटपटू*
*👉१९३० : राम प्रसाद गोएंका – उद्योगपती*
*👉१९२२ : यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते*
*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*
*👉१९९४ : निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली*
*👉१९८९ : वसंतदादा पाटील –* *महाराष्ट्राचे ६ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ*
*👉१९५५ : नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🥇सामान्य ज्ञान 🥇*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*👉चढ़ाई या शब्दाच्या विरुद्धार्थि शब्द कोणता?*
🥇माघार
*👉विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबधित आहे?*
🥇बुद्धिबळ
*👉सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे झाली?*
🥇पुणे
*👉व्याकरणतिल मराठीतील विभक्तिचे एकूण किती प्रकार पडतात?*
🥇आठ
*👉राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखुचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?*
🥇कृष्णा खोरे ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🕸 बोधकथा 🕸*
*🐶कुत्रा व सुसर🐊*
*इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी* *नदी आहे. त्या नदीत खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे पिऊ लागला.*
*कुत्र्याचे असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले डोके पाण्यावर काढून त्याला म्हणाली, 'अरे, तुला फार घाई झाली आहे का ? तू एका जागी उभा राहून पाणी का पीत नाहीस ? तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार दिवसांची इच्छा पुरी होत आहे. तुझ्या ओळखीने मला फार आनंद होतो आहे.'*
*सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला उत्तर दिले, 'तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो. पण खरंच बोलायचं झालं तर मी असा जो घाईघाईने पाणी पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच.*
*🧠तात्पर्य :-*
*वाईट स्वभाव असलेल्याशी आपला संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment