Posts

Showing posts from September, 2021

नवोदय विद्यालय माहिती

Image
राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत. पुढच्या शैक्षणिक वर्षात (२०२२-२३) इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी ही निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.  प्रश्‍न - नवोदय विद्यालयात कोणत्या वर्गात प्रवेश घेता येतो? राज्यातील नवोदय विद्यालयांमध्ये फक्त सहावीच्या वर्गात प्रवेश घेता येतो. यासाठी इयत्ता पाचवीच्या वर्गात असतानात यासाठीच्या निवड चाचणी परीक्षेला बसावे लागते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार हे प्रवेश दिले जातात. नवोदय विद्यालयांचे शिक्षण मंडळ (बोर्ड) कोणते असते? १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवोदय विद्यालयांची स्थापना केलेली आहे. यानुसार केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय नवोदय विद्यालय समिती स्थापन केलेली आहे. या स्वायत्त यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांत मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आह...

पंडित जवाहरलाल नेहरु

पंडित जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 889 रोजी अलाहाबाद येथे एका सुसंस्कृत व सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे त्या काळातील एक ख्यातनाम वकील होते. त्यांनी भारताच्या आंदोलनातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशाप्रकारे जवाहरलाल नेहरू यांच्यावर राजकारण्यांचे व सार्वजनिक कार्य संस्कार घरातून झाले होते. त्यांच्या दृष्टीने तो एक प्रकारचा कौटुंबिक वारसा होता. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या घरी अलाहाबाद येथे झाले. पुढे शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे हेरो येथील पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर ते केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेज मध्ये दाखल झाले सण 1912 मध्ये बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. भारतात आल्यावर नेहरूंनी अलाहाबाद येथे वकिली सुरू केली. परंतु लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्या काळी त्यांनी होमरूल लीग या संघटनेचे कार्य केले. पुढे ते महात्मा गांधीजी च्या सहवासात आले. गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाने ते अत्यंत प्रभावित झाले आणि गांधीजीचे परमभक्त व लाडके शिष्य बनले. अर्थात गांधीवादातील काही तत्त्वावर नेहरूंचा विश्वास असला...

online class

https online class ://us02web.zoom.us/j/86140440981?pwd=Rno2Y3g4RUxhMTRUL3JTeXlKdlAxdz09 online class