तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?
*तुमच्या जिल्ह्याचं नाव कसं पडलं ?* महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्याची वेग वेगळी अशी वैशिष्ट्ये आहे. * अमरावती * एक महत्त्वाचे,मध्यवर्ती,औद्यो गिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटन केंद्र अशी ओळख असलेला हा जिल्हा. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. मूळ नाव उमरावती होते. त्यानंतर अमरावती असे झाले. * औरंगाबाद * हा जिल्हा खाम नदीच्या काठी वसलेला आहे.आजच्या औरंगा बादचे नाव पूर्वी खडकी होते.व अ.नगरचा निजामशहा मूर्तझा व्दितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले आहे. मलिक अंबरने या शहराचे नाव फतेहपूर असे ठेवले होते. पुढे औरंगजेब या सम्राटाच्या नावावरुन औरंगाबाद हे नाव त्याच्या मृत्यूनंतर ठेवण्यात आले. * बीड * हा जिल्हा बालाघाट डोंगराच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात बिळासारख्या ठिकाणी हे शहर वसलेले असल्याने बीळ या अपभ्रंशातून बीड हे नाव झाले * भंडारा * हा जिल्हा पितळी भांड्यांचे शहर म्हणून ओळखला जात होता. भाणारा शब्दापासून भंडारा हे नाव पडले आहे. भाण हा शब्द भांडी या अर्थाने पूर्वी वापरला जात होता. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वापार प्रसिध्द अस...