आजचा विषय- फुफ्फुस
*आजचा विषय- फुफ्फुस* दुसरा दिवस- दि.15/05/2021 फुफ्फुसाच्या आजाराची लक्षणे-
फुफ्फुस हे शरीराच्या मुख्य अवयवांपैकी एक आहे आणि या प्रकरणात ते आहेत श्वसन प्रणालीचा मुख्य घटक. ते दोन मोठे अवयव आहेत ज्याने वक्षस्थळाचा एक मोठा भाग व्यापला आहे आणि ज्यांचे मुख्य कार्य म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड आणि शरीराच्या कार्यप्रणालीमुळे निर्माण होणारा अन्य कचरा काढून टाकताना सेल्युलर श्वसनास पर्यावरणामधून ऑक्सिजन प्राप्त करणे. हे घटक फुफ्फुसातून शरीराच्या इतर भागात किंवा अवयवांमधून फुफ्फुसांपर्यंत रक्ताद्वारे वाहिले जातात. *फुफ्फुसांचे आजार*
*कफ किंवा खोकला*
खरं तर खोकणे म्हणजे कफिंग ही आपल्या शरीराद्वारे केली जाणारी एक संरक्षक क्रिया आहे. हवेच्या मार्गातून म्यूकस म्हणजे श्लेष्मा किंवा बडका दूर करणे, विषारी द्रव्य अथवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली गेली तर ती बाहेर फेकणे अशी कामं ह्यामुळं होतात. अशा रातीनं खोकला चांगला (प्रॉडक्टिव) किंवा वाईट (अनप्रॉडक्टिव) असू शकतो - चांगल्या खोकल्यानं हवेचा मार्ग स्वच्छ करण्याचं काम केले जाते. मात्र सततचा किंवा वाढता खोकला, ताप चढणे, धाप लागणे किंवा कफातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. फुफ्फुसांच्या आजाराचं सर्वसामान्य लक्षण म्हणजे खोकला.
*डिस्पिनिया*
डिस्पिनिया म्हणजे श्वास घेताना धाप लागणे हे श्वसनसंस्थेचे विकार, दृदयरोग, चिंता ह्यांवरदेखील अवलंबून असू शकते. इतर लक्षणांसोबत सतत धाप लागणे हे रोगाचं चिन्ह असू शकते. अशावेळी लगेच डॉक्टरांना दाखवा. ध्यानात ठेवा, धाप लागण्याचा आणि वाढत्या वयाचा कोणताही थेट संबंध नसतो - त्यामुळं धाप लागण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
*श्वास घेताना आवाज येणे*
श्वास घेताना किंवा सोडताना शिट्टीसारखा आवाज येऊ शकतो. ह्याचं कारण म्हणजे श्वसनमार्ग अरुंद बनणे, त्यांमध्ये उतींची अनावश्यक वाढ होणे, त्यांची जळजळ होणे, श्लेष्माचं वाढलेले प्रमाण किंवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली जाणे. ह्या लक्षणानं फुफ्फुसांची एकंदर ढासळती स्थितीदेखील दाखवली जाते.
*छातीत दुखणे*
फुफ्फुसं, फुफ्फुसावरणाची जळजळ किंवा छातीच्या पिंजर्यामधील स्नायू तसंच हाडांच्या समस्यांमुळे छातीत दुखू शकते. हे दुखणे किरकोळही असू शकते तसंच गंभीरही - कधीकधी जिवावर बेतणारं देखील. छातीत सतत दुखू शकते किंवा फक्त श्वास घेताना. खोकला किंवा ताप येऊन छातीत दुखत असेल तर मात्र जंतुसंसर्गाची शक्यता असू शकते. छातीत दुखत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.
*हिमोटायसिस*
हिमोटायसिस म्हणजे खोकताना रक्त पडणे. हे रक्त शुद्ध स्वरूपात थेट पडू शकते किंवा कफ अथवा बडक्यामध्ये लालसर-गुलाबी फेस अथवा रेषांच्या स्वरूपात. ही समस्या सततच्या खोकण्यामुळं उद्भवू शकते पण अशावेळी फुफ्फुसांचा काही गंभीर आजार आढळण्याची शक्यता जास्त असते.
*सायनोसिस*
रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण पुरेसं नसले तर अशा व्यक्तीची त्वचा निळसर-जांभळ्या रंगाची दिसते, विशेषतः ओठांभोवती आणि नखांच्या मुळाशी. फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमुळं सायनोसिस अचानक उद्भवू शकतो किंवा फुफ्फुसांची स्थिती वर्षानुवर्षं बिघडत गेल्यास सायनोसिसचीही लक्षणे दिसत राहतात.
*सूज*
हातापायांवर, विशेषतः पायाच्या घोट्यावर सूज दिसल्यास हे फुफ्फुसांच्या आजाराचं लक्षण असू शकते. ह्याचा संबंध सामान्यतः हृदयविकाराशीदेखील असू शकतो आणि त्याबरोबरीनं धाप लागू शकते. बरेचदा, अनेक आजारांचा परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर एकदमच होत असल्यानं, सारखीच लक्षणे दिसू शकतात.
*श्वसनक्रिया थांबणे*
हे फुफ्फुसांच्या आजाराचं सर्वांत गंभीर लक्षण आहे. जबरदस्त मोठा जंतुसंसर्ग, फुफ्फुसांची जळजळ, हृदय थांबणे ह्यांमुळं हे होऊ शकते. फुफ्फुसं रक्ताला पुरेसा ऑक्सिजन पुरवू शकत नाहीत आणि/अथवा रक्तामधला कार्बनडायॉक्साइड काढून घेऊ शकत नाहीत.
फुफ्फुसांच्या आजारांची कारणे आणि त्यामधले धोके
फुफ्फुसांच्या आजारामुळे लहान-मोठ्या सर्वांनाच त्रास होतो. पण लहान वयात हा त्रास जास्त होतो आणि बालमृत्यूच्या कारणांपैकी फुफ्फुसांचा आजार हे एक मोठं कारण आहे.
*धूम्रपान करू नका*
*धुम्रपान-* वारंवार धूम्रपान करणाऱ्या बाबांमुळे त्यांच्या लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
धूम्रपानामुळं आपल्या शरीरावर भयानक परिणाम होतात. सिगरेट किंवा बिडी ओढल्यानं फक्त फुफ्फुसांचे आजारच होतात असं नाही तर एंफिसेमा, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्यचीही शक्यता असते. शरीराच्या इतर अनेक अवयवांवर आणि त्यांच्या कामावरदेखील धूम्रपानाचे वाईट परिणाम होतात. *उपाय-* जास्त मीठ खाण्याची सवय बदला
मीठामुळे अन्नाची चव वाढते. सगळ्या अन्न पदार्थात मीठ हे टाकलेच जाते. परंतु, त्याचे जास्त सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. फुफ्फुस आणि हृदयासंबंधित समस्या टाळण्यासाठी आहारात मर्यादित प्रमाणात मिठाचा समावेश करा. तसेच सकाळचा नास्ता /ब्रकफास्ट हा लिकविड मध्येच असावा.
*मद्यपान टाळा*
अल्कोहोलमध्ये उपस्थित असलेल्या इथेनॉलचा आपल्या फुफ्फुसांच्या पेशींवर परिणाम करतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे न्यूमोनिया आणि फुफ्फुसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. आपण दम्याचे रुग्ण असाल तर, ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते. म्हणूनच, अल्कोहोल सेवन करणे पूर्णपणे टाळा
*प्रोसेस्ड मीट’मुळे सुजेची समस्या*
प्रक्रिया केलेले मांस अर्थात ‘प्रोसेस्ड मीट’चे जास्त प्रमाणात सेवन केल्याने फुफ्फुसात सूज आणि मोठ्या प्रमाणात तणाव यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे ‘प्रोसेस्ड मीट’ खाणे टाळा. तसेच तळलेले भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. या बदल्या lo GI असलेला आहार घ्यावा.
*शुगरी ड्रिंक्स*
बाजारात विकले जाणारे कार्बोनेटेड शुगरी ड्रिंक्स आपल्या सगळ्यांनाच आवडतात. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने ते खूप हानिकारक आहेत. अशा प्रकारच्या पेयांचे जास्त सेवन केल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढते, फुफ्फुसांचा त्रास निर्माण होतो, हे बर्याच प्रकरणांमध्येही दिसून आले आहे. जर आपण वजन कमी किंवा नियंत्रीत करत असाल तर अशा प्रकारचे पेय 100% टाळावेत.
*व्यायाम*
1.*एरोबिक्सः* लयीच्या वेगाने मोठ्या स्नायू गटांना लक्ष्य करून फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यात एरोबिक्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे आपले हृदय आणि फुफ्फुस मजबूत बनवते आणि शरीराची सहनशक्ती सुधारण्यात देखील भूमिका बजावते. म्हणून, शरीर ऑक्सिजन अधिक कार्यक्षमतेने वापरण्यास सक्षम असेल आणि यामुळे आपला श्वासोच्छ्वासही वाढू शकेल. 2.*हसणे आणि गाणे:*
पोटातील स्नायूंवर कार्य करणारी कोणतीही क्रिया देखील फुफ्फुसांना लक्ष्य करते. हसणे आणि गाणे दोघेही असे करतात. हसण्याने केवळ आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढत नाही, तर शिंपडलेली हवा फुफ्फुसातून बाहेर येते, 3.*पाणी-आधारित व्यायाम*: वॉटर वर्कआउट्स आपल्या शरीरास कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात कारण पाणी प्रतिकार करण्याचे स्रोत म्हणून कार्य करते. हे फुफ्फुसांना बळकट करण्यात मदत करते. 4*.कार्डियो व्यायाम:* कार्डिओ व्यायामामुळे फुफ्फुसांची क्षमता अनेक पटीने वाढते. किमान 30 मिनिटांची कसरत आवश्यक आहे. येथे मूलभूत सत्य अशी आहे की जेव्हा एखादी व्यक्ती वेगवान व्यायाम करत असताना थकली जाते तेव्हा त्याच्या फुफ्फुसांना अधिक कठोर परिश्रम करावे लागतात. यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते फ्रि 35 मिनीटाच्या व्यायामासाठी आमच्या वेलनेस टिमला संपर्क करा- 8380841411
*कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल* कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल होतो. प्रथिनांच्या प्रमाणात असामान्य बदल होतात आणि या पेशींमध्ये प्रथिनांच्या फॉस्फोरिलेशनचं प्रमाण वाढतं. हे असामान्य बदल आहेत. याशिवाय यामुळे विषाणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. कालांतराने विषाणू पेशी नष्ट करतात. त्यामुळे फुफ्फुसाला इजा होते, असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. *जर आपल्याला काही समस्यां असल्यास किंवा आपपल्याला या समस्या होऊच नये यासाठी योग्य सकस संतुलित आहार व व्ययामाने 100%फरक पडू शकतो. आहार व व्यायाम मार्गदर्शनासाठी आमच्या वेलनेस टिमला संपर्क करा - 8380841411 आपणास zoop app व्दारे माहिती मिळेल 👍 *माहिती आवडली तर नक्की शेअर करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा...!*
✔️ *Disclaimer*: सदर माहिती केवळ जनहितार्थ प्रसारित करण्यात येत आहे. माहितीच्या सत्यतेची पडताळणी कृपया वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावी.
👌 *महत्वपूर्ण माहिती मिळवा आपल्या व्हॉट्सअॅपवर. त्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा* https://chat.whatsapp.com/In4G7uw3NVz1h9au351rU8 *प्रतिक्रिया:-* https://chat.whatsapp.com/In4G7uw3NVz1h9au351rU8
Comments
Post a Comment