Posts

Showing posts from January, 2021

आरोग्य संपदा

Image
आजारी पडण्यापुर्वी  पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो 1)कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2)हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय - दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6)सर्दी होण्याची भीती वाटतेय - नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश करा. 8.)दात लवकर पडण्याची भीती वाटतेय - फ्रिज /कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका. 9)डायबेटीस होण्याची भीती वाटते- तणावमुक्त जीवन जगा,व्यायाम करा.जागरण टाळा.साखर खाणे बंद करा.गुळ खा. 10)भीतीमुळे झोप येत नाही-रात्रि जेवणापुर्वी 2 तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या. काही आजार नसला तरी  अनुलोमीलम 15 मी  कपालभाती 15 मी  सुर्यनमस्कार 12 आर्वतन रोज करा  आरोग्य संवाद स्वतः साठी  एवढं  तरी  करा १)...

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र..

Image
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी २६ परफेक्ट गुरूमंत्र.. 1. *Empower smiling*. _चेहऱ्यावर हास्य असू द्या_ 2. *Relax yourself*. आरामशीर / तणावमुक्त रहा 3. *Have a clear understanding*. आपले विचारात सुस्पष्टता असू द्या 4. *Avoid misconceived thoughts*. गैरसमज / चुकीचे समज टाळा 5 *Prompt decision - making*. तात्काळ निर्णयक्षमता 6. *Avoid inferiority complex*. न्यूनगंड बाळगू नका 7. *Believe yourself*. स्वतःवर विश्वास ठेवा 8. *Be inspirational*. प्रेरणादायी रहा 9. *Develop challenging attitude*. आव्हानात्मक दृष्टिकोन विकसित करा 10. *Be a positive thinker*. सकारात्मक विचार ठेवा 11. *Have self – encouragement*. स्वयंप्रेरित रहा 12. *Avoid procrastination*. चालढकल (दिरंगाई) टाळा 13. *Learn lessons from others*. इतरांकडून प्रेरणा घ्या 14. *Dont lose your spirit*. हिंमत / धीर सोडू नका 15. *Think about time-use*. वेळेचे काटेकोर नियोजन करा 16. *Be smart at all costs*. नेहमी चाणाक्ष रहा 17. *Be a goal setter*. ध्येय निश्चित करा 18. *Be punctual*. तत्पर रहा 19. *Focus Involvement*. कामावर लक्ष केंद्रित करा...

सर्व मुलांसाठी उपयुक्त टेस्ट.

Image
सर्व मुलांसाठी उपयुक्त टेस्ट - DMIT आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या मुलाचं करिअर हा आई-वडिलांसाठी खूप संवेदनशील विषय असतो. मुलांचा कल ठरवायला मदत करणाऱ्या काही नवीन चाचण्या आता उपलब्ध झाल्या आहेत आजकाल आपल्या सर्वच समस्या अगदी टोकापर्यंत गेल्या आहेत. शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, त्यांचे प्रश्न.. यादी संपतच नाही. या लेखात आपल्या पाल्याच्या करिअर गाइडन्सबद्दल विचार करणार आहोत. ‘‘आमचा मुलगा ऐकतच नाही..’’ ‘‘आमची मुलगी अभ्यास करते, पण ऐन परीक्षेत काय होते कोणास ठाऊक..’’ ‘‘इतका खोडय़ा करतो आहो हा.. रोज तक्रारी..’’ ‘‘आमचा बंटी फारच हायपर आहे. कसे त्याला आवरावे तेच कळत नाही.’’ ‘‘त्याच्या लक्षात कसे राहात नाही तेच कळत नाही.’’ असे संवाद आपण रोज कुठे ना कुठे ऐकत असतो. त्यांची समस्या खरी असते. पण त्यावर नेमके काय करायचे तेच समजत नसते. खरेतर प्रत्येकामध्ये काही वैगुण्य तर काही चांगली वैशिष्टय़े निसर्ग बहाल करीत असतो. ती वेळीच ओळखता आली नाही तर पैसा, श्रम व मुख्य म्हणजे वेळ (वय) वाया जातो. म्हणज...

जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी

Image
*जगातील सर्वाधिक विद्यापीठ स्थापन करणारा पहिला सम्राट शिक्षण प्रसार महर्षी  प्रियदर्शी सम्राट अशोक यांनी स्थापन केलेली विद्यापीठे .* 👉🏻इ.पू.२८४ : *उजैन विद्यापीठ* - राजकुमार महेंद्रच्या जन्मा निमित्त 👉🏻इ.पू.२८२ : *सांची विद्यापीठ* - राजकुमारी संघमित्राच्या जन्मा निमित्त 👉🏻इ.पू.२८० : *तक्षशिला विश्वविद्यालय* 👉🏻इ.पू.२७९ : *गंधार विद्यापीठ* 👉🏻इ.पू.२७० : *नालंदा विश्वविद्यापिठ* - सम्राट अशोकाच्या राज्याभिषेका निमित्त 👉🏻इ.पू.२६८ : *उदन्तपूर विद्यापीठ* 👉🏻इ.पू.२६६ : *सारनाथ विद्यापीठ* 👉🏻इ.पू.२६५ : *मथुरा विद्यापीठ* 👉🏻इ.पू.२६४ : *दंतपूर विद्यापीठ* - जगन्नाथपूर कलिंग राजकुमार महेंद्र ,राजकुमारी संघमित्रा भिक्षु झाल्या निमित्त. 👉🏻इ.पू.२६३ : *मथुरा विद्यापीठ* 👉🏻इ.पू.२६० : *नागरा विद्यापीठ* - अहमदनगर आणि मध्यप्रदेश सिमेवर गोंदिया जिल्ह्यापासून ८ कि.मी. 👉🏻इ.पू.२५८ : *पवनी विद्यापीठ* - भंडारा महाराष्ट्र 👉🏻इ.पू.२५७ : *गिरनार विद्यापीठ* - जुनागड गुजरात 👉🏻इ.पू.२५६ : *एरागुंडी विद्यापीठ* - कुर्णाल,आंध्रप्रदेश 👉🏻इ.पू.२५५ : *गुन्टु विद्यापीठ* - कोप...

आत्म परीक्षण

Image
आत्म परीक्षण     एक शिष्य एका अरण्यात तप करत होता.आज त्याच्या तपाला बारा वर्ष पूर्ण झाली आणि गुरूने त्याला खूष होऊन एक आरसा भेट दिला आणि सांगितलं" हा असा चमत्कारिक आरसा आहे की, हा आरसा तू ज्याच्या पुढे धरशील तुला त्याच्या मनातील भाव,  भावना, विचार सहज कळतील". शिष्य खूप खूष झाला आणि त्याने थोड्याच वेळात तो आरसा ध्यानात बसलेल्या आपल्या गुरूच्या समोर धरला आणि काय? त्याला गुरूंच्या मनात तर कपट, अहंकार, लोभ अश्या भावनांचं दर्शन घडलं. तो आश्चर्यचकित झाला आणि स्वतःच्या मनालाच सांगू लागला "अरे!आपण ज्याला आपले गुरु मानले, ज्याला देवासमान पुजले, ज्याचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याच्या प्रत्येक शब्दांवर आज पर्यंत मार्गक्रमण करत आलोत त्या गुरूंच्या मनात कपट, अहंकार, लोभ कमाल आहे. त्याला वाईट वाटले आणि त्या गुरूंचा त्याला रागही आला तो तडक तिथून निघाला.      थोडा पुढे आला आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. त्याला वाटेत अनेक लोक भेटली त्याने प्रत्येकाच्या पुढे आरसा धरला आणि प्रत्येक माणसाच्या मनातील भावनांचे, विचारांचे  त्याला दर्शन घडू लागले. काही लोक मनात द्वेष, ...

करियर विषयक पुस्तक

Image
करियर विषयक पुस्तक... https://drive.google.com/file/d/1HuPIq6dCoPextURVk20uTsDUV5cDwMNu/view?usp=drivesdk

एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.

⭕️ *एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.* ⭕️ अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव. *अ*:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर *ग*:-गङचिरोलि, गोंदिया *क*:- कोल्हापूर *म*:- मुंबई *ला*:- लातूर *उ*:- उस्मानाबाद *ठ*:- ठाणे *पा*:- पालघर, पुणे, परभणी *य*:- यवतमाळ *धु* :- धुळे *र*:- रायगड, रत्नागिरी *स*:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग *भ*:- भंङारा  *जे*:- जळगाव, जालना *च*:- चंद्रपूर *हा*:- हिंगोली *ब*:- बिड, बुलढाणा *न*:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद *व*:- वर्धा, वाशिम