हे चार संकेत सांगतील क्षेत्र बदलण्याची आवश्यकता आहे का..

नोकरीत असंतुष्ट असाल तर क्षेत्र बदलण्याच्या फायदे बाबतीतही विचार करू शकता. निर्णय घेण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या 4 संकेत याबाबत जाणून घ्या..

हे चार संकेत जेव्हा जुनी नोकरी सोडून नवे काम सुरू केले पाहिजे

संस्थेतील वातावरण लक्षात न येणे आणि सतत सकारात्मकता वाट्याला येऊनही बहुतांश जण जुनी नोकरी सोडत नाहीत. बदलाला ते घाबरतात किंवा क्षेत्र बदलल्यामुळे होणाऱ्या फायदे विषयी ते विचार करू शकत नाहीत. त्यामुळे ती जुनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. हे 4 संकेत आपल्याला सांगतील की आता बदलायची वेळ आली आहे.


नवीन 
नवीन काही शिकू शकत नसाल तर प्रगती नाही

सध्या तुम्ही जे नोकरी करत आहात जे कोणते काम करत आहात त्यातून जर तुम्हाला काहीही शिकायला मिळत नसेल तर हे समजून घ्या की प्रगती थांबली आहे संशोधने असे सांगतात की वाढत्या वयासोबत तुम्ही सतत काही शिकत नसाल तर तुम्ही संतुष्ट नाही तुम्ही शिकत शिकत वृद्धत्वाकडे जात असाल तर तुम्हाला आनंदाची अनुभूती येईल सतत शिकत राहणे हे बुद्धीचे पोषण करण्यासारखे आहे आणि यामुळेच आनंद मिळतो


उत्साह 
कंटाळा येतोय कामावर विपरीत परिणाम

सकाळी कामावर जाताना जर तुम्हाला प्रचंड मानसिक थकवा जाणवत असेल उत्साह आयोजित तुम्हाला कंटाळा येत असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होतो तुमचे परफॉर्मन्स वाईट होईल आणि भविष्यात तुमचा बायोडेटा खराब होऊ शकतो जर तुम्ही आनंदी राहून काम करू इच्छिता तर अशा कामाचा शोध घ्या जे करताना तुम्हाला उत्साह जाणवेल आणि तुम्ही शंभर टक्के परफॉर्मस देऊ शकाल.


कौतुक 
कौतुक मिळत नसेल तर तुम्ही लवकर थकाल.

तुम्हाला जर असे वाटत असेल की संस्थेत तुमच्या कामाचे कुणीही कौतुक करत नाही तर तुम्हाला निश्चितपणे खूप वाईट वाटेल जरी तुम्हाला पगार किती चांगला मिळत असेल जर व्यवस्थापक तुमच्या कामाचे कधीच कौतुक करत नसतील तर तुम्हाला प्रोत्साहन मिळत नाही त्यामुळे तुमचे काम नाही व्यवस्थित होत नाही निराश होऊन काम कराल तर लवकर थकवा जाणवेल आणि तुमच्या वागण्या वरही त्याचा परिणाम दिसेल


पैसा
फक्त पगारासाठी नोकरी तर निराश असाल

तुम्ही तुमच्या नोकरीवर अजिबात आनंदी नाही. केवळ पैशासाठी नोकरी करत आहात असे असेल तर हा अत्यंत वाईट संकेत आहे. अशा पद्धतीने काम करून तुम्ही कधीही संतुष्ट होऊ शकणार नाही आणि तुमच्या कामात प्रगती होणार नाही. जर आर्थिक अडचणीमुळे नोकरी करत जगत असाल तर नक्कीच निराश व्हाल. तुम्हाला प्रेरणा ही मिळणार नाही कमी पगारात तुमच्या आवडीचे काम कराल तर नेहमी संतुष्ट राहाल

Every person need DMIT Report 

Call for details
9404539184

Comments

Popular posts from this blog

कोणकोणते पदार्थ - उष्ण व थंड

1000 "OPPOSITE" Words in English