संशोधक - जाॅन वालर

चला आज तुम्हाला थोड्या एका ‘हटके’ संशोधन आणि संशोधकाची गोष्ट सांगतो.. सामान्यतः संशोधक किंवा शास्त्रज्ञ म्हटला वाढलेली दाढी-लांब केशसंभार-डोळ्यांवर भिंगाचा चष्मा-अंगात लांब डगला-हातात पुस्तक आणि ‘प्रयोग’ म्हटलं की परिक्षानळ्या-चंचुपात्र-लॅब वगैरे असं चित्र डोळ्यांसमोर येतं पण वस्तूत: तसं काही नाही.. अनेक सरळासाध्या लोकांनी वरवर साधे वाटणारे अनेक संशोधन केलेत ज्यांनी आख्खं जग बदलून टाकलं.. पेटंट कार्यालायतील व्यवस्थापक असलेल्या जाॅन वालरनं छोटीशी पेपर क्लिप शोधली नसती तर? कागदं गहाळ झाले असते-गैरसमज वाढले असते-मोठमोठ्या डिल्स गंडल्या असत्या,व्हिटकाॅम्बनं झिप शोधली नसती तर पॅंटपासून बॅगेपर्यंत सगळ्याचे वांदे झाले असते😅 सांगण्याचा मतितार्थ एवढाच की गुरुत्वाकर्षण-सापेक्षतावाद या मोठमोठ्या संशोधनापलिकडंही अनेक छोटे मोठे संशोधन-प्रयोग विज्ञान जगतात झालेत ज्यांनी मोठ्ठा इतिहास घडवला.. विज्ञानजगतातला ‘बॉलपॉईंट’ पेनचा शोध हा देखील कुठल्याही ‘क्रांती’पेक्षा कमी नाही.. जगातला असा कोपरा नाही जिथं ‘बॉलपॉईंट’ पेनचा वापर होत नाही.. बॉलपॉईंट पेनचा शोध आजपासून सुमारे आठ दशक आधी १९३१ साली ल...