Posts

Showing posts from September, 2023

*जखमेवर घरगुती उपाय :-*

*जखमेवर घरगुती उपाय :-*              जखम छोटी असो वा मोठी त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळेला घरात काचेची भांडी फुटल्यामुळे तर अपघातामुळे त्वचेवर कापल्यासारख्या जखमा होतात. काचेपासून झालेल्या या जखमा भरून येण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खोल जखमेसाठी डॉक्टरांचे उपाय आवश्यक आहेतच; पण इतर जखमांसाठी आपण घरगुती उपाय करून जखम बरी करू शकतो आणि संसर्गाचा धोका टाळू शकतो. जखम छोटी असेल तर सर्वप्रथम जखम स्वच्छ करावी, कारण व्यवस्थितपणे जखम स्वच्छ करणे हे ती थंड पाण्याच्या नळाखाली जखम झालेला भाग धरावा. यामुळे जखमेवर लागलेली धूळ, जीवजंतू निघून जाण्यास मदत होईल. शिवाय थंड पाण्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. नंतर स्वच्छ टॉवेलने हळूवारपणे जखम कोरडी करावी. त्यानंतर निर्जंतूक ड्रेसिंग करून किंवा बँडेज लावून ती जखम झाकावी.  *घरगुती उपाय* *हळद:-*           हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक आणि प्रतिजैवीक घटक आहे. त्यामुळे हळदसुद्धा काचेमुळे झालेल्या जखमेसाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी वापरता येते. रक्‍तस्त्राव होत असल्यास त्यावर थेट हळ...